मुंबईच्या लोकलमधून होणार होती कासवांची तस्करी पण...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

लोकलमधून तस्करीसाठी मुंबईत आणलेल्या तब्बल 523 स्टार प्रजातींच्या कासवांना वाचवण्यात सरकारी यंत्रणेला आज यश आले. गुप्तवार्ताहराने दिलेल्या टीममधून कुर्ला (पू.) भागांत छापा टाकत या कासवांची सुटका करण्यात आली. 

महसूल, वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो आणि वनविभागाने मिळून ही कारवाई करण्यात आली. ही कासवे आंध्रप्रदेशातून आणण्यात आली होती. एका महिलेकडून ही कासवे मुंबईत आणली जाईल, अशी माहिती गुप्तहेरांकडून वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्युरोला मिळाली होती.

ही महिला लोकमान्य टिळक टर्मिनसला स्टार प्रजातींची कासवे घेऊन येईल, अशीही टीम मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. ही कासवे मुंबईतील पाळीव प्राणी विक्रेत्यांना विकण्यात येणार होती, अशी माहिती या महिलेकडून मिळाली. या महिलेची सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरु होती, अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या

Saam TV Live