भाजप सदस्य नोंदणीची मोहिम सहा जुलैला प्रारंभ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

नवी दिल्ली : भाजपच्या महत्त्वाकांक्षी सदस्य नोंदणी मोहिमेला सहा जुलैला प्रारंभ होईल. भाजपची फारशी चांगली स्थिती नसलेल्या बूथवर लक्ष केंद्रित करून हे अभियान राबविले जाईल. पश्‍चिम बंगाल, केरळ या राज्यांमध्येही सर्वशक्तिनिशी सदस्य नोंदणी केली जाणार असून, दहा ऑगस्टपर्यंत ही मोहीम चालेल.

सदस्य नोंदणी मोहिमेसाठी नियुक्त केलेले राष्ट्रीय समन्वयक व पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी या मोहिमेच्या वेळापत्रकाची रूपरेषा शुक्रवारी स्पष्ट केली. सदस्य नोंदणी मोहीम म्हणजे भाजपचे संघटनापर्व असून जनसंघाचे संस्थापक श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच सहा जुलैपासून सदस्य नोंदणीस प्रारंभ होईल. या मोहिमेत सध्याच्या 11 कोटी सदस्य संख्येमध्ये 20 टक्के, म्हणजे 2.20 कोटी नव्या सदस्यांना जोडण्याचे लक्ष्य असेल. भाजपचे 20 टक्के सदस्य वाढविण्याचे लक्ष्य असले तरी राज्य शाखांना याहून अधिक सदस्य नोंदणीची मुभा असेल.

भाजपचा फारसा प्रभाव नसलेल्या केरळ, पुद्दुचेरी, लक्षद्वीप, ओडिशा, तेलंगण, पश्‍चिम बंगाल, काश्‍मीर, आंध्र प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्येही सदस्य नोंदणी मोहीम सर्व शक्तिनिशी राबविली जाईल. भाजपतर्फे जाहीर केल्या जाणाऱ्या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सदस्य होता येईल. मात्र केवळ त्यावरच विसंबून न राहता मिस्ड कॉल देणाऱ्यांना पक्ष कार्यकर्ते प्रत्यक्ष भेटून सदस्यत्वाचा अर्ज भरून घेतील. यातून सदस्य नोंदणीची पडताळणीही होईल. 

"सबका साथ, सबका विकास' हा भाजप सरकारचा, तर "सर्वस्पर्शी भाजप, सर्वव्यापी भाजप' हा पक्षाचा मूलमंत्र आहे. 
- शिवराजसिंह चौहान, सदस्य नोंदणी मोहिमेचे राष्ट्रीय समन्वयक

Web Title: BJP will Concentrate on Kashmir Bengal and Kerala

संबंधित बातम्या

Saam TV Live