भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 59 वर

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 59 वर

नवी दिल्ली - चीनच्या वुहान शहरातील कोरोनाने शंभर देशात पाय पसरले आहेत. भारतही त्यास अपवाद राहिला नसून काश्‍मीरपासून केरळपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. भारतात गेल्या चोवीस तासांत नव्याने सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्याची एकूण संख्या ५९ वर पोचली आहे. दुबईहून पुण्यात परतलेल्या दोघांसह  ५ जणांना बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. 

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकलच्या माहितीनुसार, एक रुग्ण केरळमध्ये, दोन पुण्यात, तीन बंगळूर येथील रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. देशभरातून 1,544 जणांचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. राजधानी दिल्लीत संसद भवन परिसरातही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. संसद परिसरात नागरिकांना मोठ्या गटाने येण्यास मनाई केली आहे. 

बंगळूर : कर्नाटकमध्ये नव्याने तीन रुग्ण आढळून आले असून बाधित रुग्णांची संख्या चारवर पोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री बी. श्रीरामलू यांनी दिली. चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालात म्हटले आहे. त्यांच्या कुटुंबीयाला विलगीकरण कक्षात ठेवल्याचेही सांगण्यात आले. कर्नाटक सरकारकडून प्रयोगशाळेत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी योजना आणली जात असून त्यात अतिरिक्त आरोग्य विमा दिला जाणार आहे.  

तिरुअनंतपूरम : केरळमध्ये कोरोना व्हायरसचे नव्याने सहा रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत १२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यापैकी तीन जण इटलीहून आले होते आणि उर्वरित ८ जण त्यांच्या संपर्कात आले होते. कोची येथे युरोपाहून परतलेल्या एका तीन वर्षांच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, ३१ मार्चपर्यंत शाळा, कॉलेज, टॉकिज बंद राहणार.

श्रीनगर : इराण आणि चीनहून परतलेले बडगाम जिल्ह्यातील ४१ नागरिकांना नऊ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी ७१ खाटांची सोय करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जिल्हा विकास आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. यापैकी ३१ नागरिक इराणहून तर दहा जण चीनहून आले आहेत. याशिवाय कोरिया आणि मलेशियाहून आलेले दोघांना बाधा झाली असून त्यांना एसकेआयएमएसमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

कर्नाटकातील कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सरकारकडून अतिरिक्त आरोग्य विमा दिला जाणार आहे.
- डॉ. के. सुधाकर, कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री

Web Title 59 People Corona Virus Affected In India

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com