आता 5Gमुळे लवकरच दिसेल ड्रायव्हरशिवाय चालणारी कार...

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 1 जानेवारी 2020

येत्या काही वर्षांत तुम्हाला रस्त्यावर ड्रायव्हरशिवाय धावणारी गाडी दिसली तर आश्चर्य वाटू देऊ नका..किंवा एखादा रोबो धोकादायक मशिन चालवताना दिसला तरीही दचकू नका. लवकरच भारत एका नव्या तंत्रज्ञान क्रांतीला सामोरा जाणाराय..

येत्या काही वर्षांत तुम्हाला रस्त्यावर ड्रायव्हरशिवाय धावणारी गाडी दिसली तर आश्चर्य वाटू देऊ नका..किंवा एखादा रोबो धोकादायक मशिन चालवताना दिसला तरीही दचकू नका. लवकरच भारत एका नव्या तंत्रज्ञान क्रांतीला सामोरा जाणाराय..

धक्का बसला ना..पण हे खरंय..नजिकच्या भविष्यकाळात भारत तंत्रज्ञान क्षेत्रातली महासत्ता होणाराय..त्या दृष्टीनं भारताची वाटचाल सुरू झालीय..कारण लवकरच भारतात 5 जी सेवेला सुरुवात होणाराय.
5 जी सेवेनं संपर्क क्षेत्रात जशी क्रांती होईल, तसंच ज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातही आमूलाग्र बदल होईल.
होय, लवकरच भारतात 5 जी सेवा सुरू करण्यासाठी सरकार पावलं उचलतंय. सरकारनं सर्व कंपन्यांना 5 जी सेवा पुरव्याच्या दृष्टीनं परीक्षणास परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय..दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांनीच ही माहिती दिलीय. फाईव्ह जी सेवा प्रत्यक्षात आल्यानंतर काय बदल होतील, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
5 जी सेवेचा वेग सध्याच्या 4 जी किंवा एलटीई नेटवर्कपेक्षा 30 ते 40 पट अधिक आहे. त्यामुळे आपण सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणं एकमेकांना जोडू शकतो आणि त्यांच्यावर कंट्रोल ठेवू शकतो. सेल्फ ड्रायव्हिंग कार हे स्वप्न न राहता, प्रत्यक्षात साकार होईल. अखंडित लाईव्ह एचडी स्ट्रिमिंग त्यामुळे सोपं होईल. ऑर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर 5जीमुळे शक्य  होईल. महत्त्वाचं म्हणजे अनेक धोकादायक किंवा गुंतागुंतीच्या क्रिया या तंत्रामुळे सोप्या  होतील. एखादं धोकादायक उपकरण 5जी तंत्रज्ञानामुळे दूरवरून नियंत्रित करता येईल. किंवा धोकादायक शस्त्रक्रिया रोबोद्वारे करता येऊ शकते. येत्या काही वर्षांत 5जी सेवा भारतातही सुरू होईल. त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झालेत. 2025 पर्यंत जगभरातील एक तृतीयांश मोबाईलधारक 5जी धारक होतील..मानवी प्रगतीच्या दृष्टीनं 5 जीचं आगमन हा एक महत्त्वाचा टप्पा  असेल हे नक्की..


संबंधित बातम्या

Saam TV Live