60 वर्षांच्या एसटीला न सोसवणारा आपला भार पाहून 'त्यांना' फारच वाईट वाटले

ज्ञानेश्वर रायते
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

वाट पाहीन पण एसटीनेच जाईन, यावर ठाम असलेल्या विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ प्रवाशांनाही आज एसटीला न सोसवणारा आपला भार पाहून फारच वाईट वाटले. बारामतीकडे निघालेल्या एसटीला एक चढण एसटीतील सर्व प्रवासी खाली उतरूनही काही लवकर चढता आली नाही. अर्थात एसटीने साठ वर्षे पूर्ण केल्याने ती "साठीत' गेल्याचा प्रत्यय सर्वांनाच आल्याने कोणीही निषेध वगैरे न करता एसटीला शांतपणे चढण चढू दिले आणि नंतरच एसटीत बसून बारामती गाठली.

ग्रामीण भागातून बुधवारी बारामतीकडे निघालेल्या बसचा येथील एका चढणीवरचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला. या गाडीतून शाळेकडे जाणारे विद्यार्थी बारामतीकडे निघाले होते. मात्र गाडी एका चढणीवर आल्यानंतर चालकाने गाडीची अवस्था माहिती असल्याने सर्वांनी खाली उतरा, गाडी चढणीवर गेल्यानंतरच सर्वांनी गाडीत बसा, नाहीतर गाडीच पुढे सरकणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर सर्वांनी खाली उतरून थेट पुढचा रस्ता धरला. मग एसटी हळूच थोडी वर आली. मग वाहकाने येतेय, येतेय अजून जोरात चालव असा इशारा चालकास दिला. मग चालकाने धीर धरून गाडी पुढे दामटली. मात्र, जेवढी पुढे नेली, ती तेवढ्याच वेगाने एकदम खाली गेली.

बऱ्यापैकी चढलेली चढण पुन्हा पीछेहाट झाल्याने चालकही वैतागला. पण सिंह काही दमत नाही, तो दोन पावले मागे येतो, म्हणजेच पुढे जोरात चार पावले उडी घेण्यासाठीच येतो असे समजत मग पुन्हा त्यानेच कसरत करून सारा धीर एकवटून गाडी वेगाने पुढे आणली आणि गाडीने यावेळी मात्र यश खेचून आणले आणि गाडी चढण चढली. वरती आलेल्या बसमध्ये मग विद्यार्थी बसले आणि काका, पुन्हा उद्या असली एसटी आणू नका, असा सल्लाही विद्यार्थ्यांनी चालककाकांना दिला.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live