67 टक्के राज्य कोरडंठाक, शेतकऱ्यांवर मोठं संकट

साम टीव्ही
शनिवार, 1 ऑगस्ट 2020
  • शेतकऱ्यांवर संकट
  • 67 टक्के राज्य कोरडंठाक
  • 36 पैकी फक्त 12 जिल्ह्यात चांगला  पाऊस

कोरोनाच्या संकटातून सावरत असतानाच बळिराजावर पावसानं अवकृपा केलीय. त्यामुळे अगोदरच संकटात असलेला शेतकरी आणखीनच अडचणीत आलाय. पाहुयात अपुऱ्या पावसाची ही कथा.

हवामान खात्याचा सरासरी 102 ते 104 टक्के पावसाचा अंदाज साफ खोटा ठरवत वरुणराजाने महाराष्ट्रावर पाणीटंचाईचं संकट आणलंय.  पुणे जिल्ह्यात जून-जुलैमध्ये सरासरी फक्त 20 मि.मी. पाऊस झाल्याने लोकांची चिंता वाढलीय. तर कोल्हापूरसह आठ जिल्ह्यांत जुलैअखेर उणे पर्जन्यमान नोंदविलं गेलंय. महाराष्ट्राच्या 67 टक्के भागांत सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झालाय. पण एरव्ही मराठवाड्यावर रुसलेला वरुणराजा यंदा मात्र मराठवाड्यावर मेहरबान झालाय. मराठवाड्यात जूनपाठोपाठ जुलैमध्येही 54 टक्के इतका जास्त पाऊस झालाय.गंभीर बाब म्हणजे विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यात शून्य टक्के पावसाची नोंद झालीय. तर बहुतांश विदर्भही कोरडाच आहे. उत्तम पावसाच्या कोकणातही यंदा उणे 48 टक्के इतका कमी पाऊस झालाय.

पण जून-जुलैची कसर आता पाऊस ऑगस्टमध्ये भरून काढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. ३ ऑगस्टपासून राज्यात मोठा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोरोनाचं संकट ओसरत असतानाच किमान पावसानं नवं संकट उभं करू नये हीच अपेक्षा.


संबंधित बातम्या

Saam TV Live