वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द, वाचा कसं असेल आरक्षण?

साम टीव्ही
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात वैद्यकीय प्रवेशासाठी जात आणि प्रवर्गनिहाय आरक्षण लागू असताना, पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची जाचक अट लावण्यात आली होती.

आताची एक मोठी बातमी आहे. वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द करण्यात आलीय. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत यासंबंधी घोषणा केलीय. त्यामुळे साम टिव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय. ही पद्धत रद्द होणार असल्याची बातमी साम टिव्हीनं दाखवली होती. 

भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात वैद्यकीय प्रवेशासाठी जात आणि प्रवर्गनिहाय आरक्षण लागू असताना, पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची जाचक अट लावण्यात आली होती. त्यामुळे मराठवाडा विभागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. मराठवाड्यात केवळ 6 तर विदर्भात 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. अशा परिस्थितीत 70:30 कोटा निर्माण करून प्रादेशिक आरक्षण लागू झाल्याने याचा फटका वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत होता.

याबाबत विधानपरिषदेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सातत्याने आवाज उठवत 70:30 कोटा पद्धत रद्द करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेत केली होती. आता ही मागणी मान्य झालीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live