VIDEO | 80 वर्षांच्या पैलवानाने; 80 तासांत सरकार पाडलं !

VIDEO | 80 वर्षांच्या पैलवानाने; 80 तासांत सरकार पाडलं !

बाप बाप असतो, हे आता पुन्हा एकदा चर्चिलं जातंय. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातंय. आधी निवडणूक प्रचाराचं मैदान मारलं. त्यानंतर अल्पावधीत सरकार पाडलं. अशी सगळी किमया या बाप माणसाला कशी जमली?, पाहूयात हे सविस्तर विश्लेषण...

अजित पवारांच्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. राजकीय वातावरण ढवळून निघालं. पण शरद पवारांनी राजकारणातला बाप माणूस कोण आहे, हे पुन्हा दाखवून दिलं. 80 वर्षांच्या या पैलवानाने 80 तासांतच फडणवीस सरकारला चितपट केलं आणि भाजपला धूळ चारली! अजित पवारांच्या बंडानंतरही शरद पवारांच्या मनात किंचितही चलबिचल नव्हती. पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना खेचून आणलं. नेमकं काय घडलंय, हे अक्षरशः वदवून घेतलं. पण शिवसेनेलाही पवारांनी त्याआधी गुगली टाकली होती, हे विसरुन चालणार नाही!शरद पवार जे बोलतात, ते कधीच करत नाही, याची प्रचिती महाराष्ट्राच्या जनतेला अनेकदा आलेली आहे. यावेळीही पवारांनी तेच केलं. शिवसेनेला सोबत घेतलं. त्यानंतर अखेरपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना सांभाळलं. शरद पवार हॉटेलमध्ये जाऊन आमदारांना वेळोवेळी भेटत होते. बैठकांचा जोर सुरुच होता. या राजकीय धामधुमीतही शरद पवार कराडला गेले. यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहिली. शेकडो मैल प्रवास करुन शरद पवार थकले नाही. राजकीय भूकंपाचे धक्के पचवत असतानाही, त्यांनी बाप कसा असतो?, हे दाखवून दिलं. हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस.. शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले.. यानंतर लगेचच मोदींनी शहांची भेटही घेतली.. या भेटीत काय झालं असेल? फ्लॅशबॅकच्या थोडं आणखीही मागे जाऊयात...  संजय राऊत एकदा-दोनदा नाही तर वेळोवेळी शरद पवारांच्या संपर्कात राहिले! त्याआधी सातत्यानं शरद पवार एकच गोष्ट बोलत राहिले... विरोधात बसणार नाही ते महाराष्ट्र विकास आघाडीत सरकार स्थापनेपर्यंतचा प्रवास शरद पवार या बापमाणसामुळेच शक्य झालाय. या बाप माणसाने आपला झंझावात दाखवण्याची खरी सुरुवात केली, ती साताऱ्यातल्या ऐतिहासिक सभेने... पायाची जखम भळभळत होती... तरी गडी चालत राहिला... वय वर्ष 80.. पण एखाद्या तरुणाला लाजवेल, असा महाराष्ट्र पिंजून काढला... अनेकांनी साथ सोडली... पण बाप माणसाने लढणं सोडलं नाही ... कॅन्सरमधून आता कुठे शरीर बरं होतं होतं.. पण पवारांना त्याची फिकीर नव्हती... कारण लोकांमध्ये मिसळणं, हार न मानणं आणि शेवटपर्यंत लढत राहणं, एवढंच पवारांना माहितीय! विधानसभा निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला सुरुंग लावला. मेगाभरतीच्या नावाखाली अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. पण तरीही भाजप पवारांना रोखू शकली नाही! 2014 पासून असलेल्या मोदी लाटेला पवारांनी थेट आव्हान दिलंय. फक्त मोदीच काय देशातल्या भल्याभल्यांना पवारांनी दणका दिलाय. इंदिरा आणि सोनियांची हवा असतानाही पवारांनी गांधी परिवालाही थेट आव्हान दिलं होतं. सोनियाच काय, पवार तर थेट इंदिरा गांधींशीही भिडले. प्रस्थापित चेहऱ्याविरोधात लढणं हे पवारांना तेव्हापासूनच माहितीये. अनप्रेक्टीटेबल.....आणि शरद पवार या दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहेत... म्हणूनच या 80 वर्षीय झंझावाती तरुणाला राजकारणातला बाप माणूस म्हणतात, ते उगाच नाही!

Web Title - 80-year-old wrestler; Within 80 hours, the government fell

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com