64 वर्षीय अवलियाच्या पवारांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा!

64 वर्षीय अवलियाच्या पवारांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा!

शरद पवार अख्या महाराष्ट्राचे लाडके राजकीय नेते आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांसह सर्वांचच त्यांच्यावर प्रेम आहे. आणि या प्रेमासाठी जो तो ज्याच्या त्याच्या परीने त्यांना आपली श्रद्धा दाखवत असतो. असाच एक शरद पवारांचा चाहता समोर आलाय. आणि आपलं शरद पवारांसाठी असलेलं त्यांचं प्रेम या अवलियानं एका वेगळ्या पद्धतीनं व्यक्त केलंय. आज शरद पवारांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमीत्तानं  अब्दुल गणी खडके ६४ वर्षीय इसमानं वेगळ्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्यात. 

शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी अनोखा उपक्रम राबवलाय. या ६४ वर्षीय इसमाचं नाव अब्दुल गणी खडके आहे. अब्दुल हे शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी निलंगा ते काटेवाडी हा ३१० किमीचा प्रवास सायकलवरुन करतात. गेल्या २२ वर्षांपासून ते हा उपक्रम राबवत आहेत. शरद पवार यांची जन्मभूमी असलेल्या काटेवाडीत येऊन ते पवारांचा वाढदिवस साजरा करतात. शरद पवार यांनी आजपर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकासाठी जे काम केलंय ते न विसरता येणारं आहे. त्यामुळंच आपण या जाणत्या राजाला शुभेच्छा देण्यासाठी सायकलवरून येत असल्याचं अब्दुल गणी खडके सांगतात.

दरम्यान राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. महाराष्ट्रातील राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं. 80व्या वाढदिवशी शरद पवारांवर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार दाखल झाले. तिथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, आज पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने बळीराजा कृतज्ञता दिन साजरा केला जाणार आहे. 80 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने शेतकऱ्यांसाठी कृतज्ञता कोष तयार करुन 80 लाखांचा कोष सुपुर्द केला जाणार आहे. 

Web Title - 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com