Winter Session कर्जमाफीच्या घोषणेसाठी बैठकीत तयारी?

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

महाविकास आघाडीची नागपुरात बैठक सुरू आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर महत्त्वपूर्ण चर्चा होत असल्याचं समजतंय. उद्धव ठाकरे सरकारने याआधीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे संकेत दिलेत. त्यामुळे कर्जमाफीच्या घोषणेसंदर्भात या बैठकीत तयारी सुरू असल्याचं कळतंय. तसंच या अधिवेशनात भाजपच्या रणनितीला कसं सामोरं जायचं यासंदर्भातही आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होत आहे.

भाजप आमदारांवर आज कारवाई होण्याची शक्यता

भाजपच्या आमदारांवर आज कारवाई होण्याची शक्यता आहे. नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सावरकर प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ केला. यावेळी काही भाजप आमदारांनी सभागृहात बॅनरबाजी करत घोषणाही दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी करणाऱ्या आमदारांवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण सभागृहात बॅनर चालणार नाही असं अध्यक्षांनी याआधीच सांगितलं होतं. मात्र तरीही काही आमदारांनी काल सभागृहात बॅनर झळकवले. त्यामुळे बॅनरबाजी करणाऱ्या आमदारांविरोधात निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://www.youtube.com/watch?v=HLSD_Eog4_Q

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

संबंधित बातम्या

Saam TV Live