VIDEO | पुण्यात फेमस होतेय आजीची पाणीपुरी

दिलीप कांबळे
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी परिसरातल्या एका पाणीपुरीच्या गाडीवर हल्ली मोठी गर्दी असते. त्याचं कारण आहे, पाणीपुरी बनवणाऱ्या आजी. तब्बल 80 वर्षांच्या आजी तरुणांच्या चपळाईनं पाणीपुरी, भेळपुरी असे चटकदार पदार्थ स्वतःच्या हातानं तयार करतात.

या आजीबाई बघा. या आजीबाई 80 वर्षांच्या आहेत. पण तरुणालाही लाजवेल, अशा वेगानं त्यांचा हात चालतोय. समोर उभ्या असलेल्या खवय्यानं सांगितलं की त्यानं सुचवलेल्या चवीनुसार पाणीपुरी, भेळपुरी तयार करून कागदी प्लेटमध्ये सादर केली जाते. चंद्रभागा शिंदे असं या आजींचं नाव. या वयातही पाट्यावर वाटून त्या चटण्या बनवतात..त्यामुळे त्यांच्या पाणीपुरीला अनोखी चव आहे.

या आजीबाई पाणीपुरीची गाडी का लावतात. या वयातही हे काम करायची वेळ त्यांच्यावर का आलीय, हे ऐकलं तर मात्र, तुमचंही काळीज हेलावून जाईल. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीला अपघात झाला होता. त्यांच्यावरच्या उपचारांसाठी प्रचंड खर्च आला. पती तर वाचले नाहीत. मात्र, मुलांवर प्रचंड कर्ज झालं. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांनी ही पाणीपुरीची गाडी लावली.

चांगले धडधाकट तरुणही कर्जबाजारी झाले की खचून जातात.मात्र, या आजीबाई 80 व्या वर्षीही ज्या पद्धतीनं काम करत आहेत, त्यांचा हा आदर्श सर्वांनीच घ्यायची गरज आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live