VIDEO | टिकटॉकवरून केलं जातंय विडंबन

अनंत पाताडे
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

कोकणातले दशावतार कलावंत सध्या प्रचंड संतापलेत. त्यांचा राग आहे टिकटॉकवर. का संतापलेत हे कलावंत टिकटॉकवर. पाहूया एक रिपोर्ट.

कोकणातले दशावतार कलावंत सध्या प्रचंड संतापलेत. त्यांचा राग आहे टिकटॉकवर. का संतापलेत हे कलावंत टिकटॉकवर. पाहूया एक रिपोर्ट.

हे व्हिडीओ पाहिलेत? तळकोकणातली पारंपरिक कलाप्रकार असलेल्या दशावताराचं कशा प्रकारे विडंबन केलं जातंय ते पाहा. टिकटॉकवर हौशी मंडळी आपापले व्हिडीओ पोस्ट करतात. रेग्युलर पोस्ट करणाऱ्यांना आणि भरपूर हिट्स मिळवणाऱ्यांना त्यातून कमाईही होते. मात्र, यातल्या काही महाभागांची नजर दशावताराकडे वळलीय. कोकणात प्रचंड लोकप्रिय असलेल्या दशावताराचं विडंबन केलं तर त्यातून  हमखास लाईक्स मिळतील, या हेतूनं त्यांनी कोणत्याही परवानगीशिवाय असे व्हिडीओ बनवून पोस्ट केलेत.

मात्र, खऱ्याखुऱ्या कलावंतांना आपल्या कलेचं हे विडंबन सहन झालेलं नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे कलाकार दशावतारात काम करतात. सिंधुदुर्ग जिल्हा या कलेचं माहेरघर. पौराणिक कथांचा आधार घेऊन त्या आधारे कलाकार समाजप्रबोधन करतात. नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक होतकरू तरुणांना या कलेच्या माध्यमातून रोजगारही मिळतोय. सिंधुदुर्गातले जत्रोत्सव तसंच मुंबई-ठाण्यातल्या कोकण महोत्सवातही ही कला सादर केली जाते. राजाश्रय नसतानाही ही कला सादर करणाऱ्या कलावंतांबद्दल रसिकांमध्ये आदराची भावना आहे.
प्रसिद्धीसाठी दशावतार कलाकारांच्या भावनांशी खेळणाऱ्या या टिकटॉकवीरांना धडा शिकवला पाहिजेच. पण या व्हिडीओसाठीची रॉयल्टीही त्यांच्याकडून घेतली तरच त्यांना वचक बसेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live