श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या 9 नागरिकांना अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नवी दिल्ली : श्रीलंकेतील कोलंबो येथे मागील रविवारी (ता.21) दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सुमारे 350 हून अधिक नागरिकांचा जीव गेला. त्यानंतर आता या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या 9 नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.

ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंका बॉम्बस्फोटाने हादरली. या बॉम्बस्फोटात अनेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रीलंकन सरकारकडून याबाबत चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान काही माहिती समोर येत आहे. याच माहितीच्या आधारे पाकिस्तानातील 9 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच श्रीलंकेच्या हल्ल्यात एका महिलेचाही समावेश होता.

दरम्यान, श्रीलंकेतील या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने यापूर्वीच स्वीकारली असून, त्याचदृष्टीने तपास केला जात आहे.

Web Title: marathi news 9 pakistani citizens arrested in connection with serial blast at srilanka 

संबंधित बातम्या

Saam TV Live