बजाजची नवीन चेतक बाजारात; एकदा चार्जिंग केल्यावर 95 कि.मी. चालणारी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली : बजाज ऑटो या जगातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कंपनीने आज आपली पहिली इलेक्‍ट्रिक स्कूटर चेतक सादर केली. या स्कूटरच्या अनावरणप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्थित होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ती 95 किलोमीटरपर्यंत चालणार असल्याने या स्कूटरची मोठी मागणी राहणार असल्याचा विश्‍वास कंपनीने व्यक्‍त केला आहे.

या स्कूटरची विक्री जानेवारी महिन्यापासून सुरू होणार असून, स्कूटरचे पुणे आणि बेंगळूरुमध्ये अनावरण करण्यात येईल. यानंतर सर्व देशभरात ही स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

 नव्या चेतकमध्ये खास डिटेलिंगसह प्रीमिअम मटेरिअल्स आणि फिनिशेसचा वापर, सहा आकर्षक रंगांचा पर्याय देण्यात आला आहे. नव्या चेतकमध्ये घोड्याच्या नाळेच्या आकाराचे आकर्षक एलईडी हेडलाईट आणि डीआरएल हे अगदी हलक्‍या स्पर्शानेही चालू होणारे इलेक्‍ट्रॉनिक स्वीचेस तसेच क्रमाने स्क्रोल होणारे एलईडी ब्लिंकर्स आहेत. यातील मोठ्या डिजिटल कन्सोलमुळे गाडीबद्दलची माहिती अत्यंत स्पष्टपणे दिसते.

मूळ चेतक फक्त एका स्कूटरपेक्षा अधिक काही होती. भारतातील कित्येक पिढ्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करत तिने वैयक्तिक दळणवळणाचा मार्ग दाखवला. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना चेतकने तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षाकाळाचा सर्वोच्च मानही अनुभवला. या गाडीच्या पुनर्विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा अधिक येत असे! त्यामुळे भारतात 1.3 कोटींहून अधिक चेतक विकल्या गेल्या आहेत. 

लिथिअम इऑन बॅटरी

अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त नव्या चेतकमधील अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे यातील एनसीए सेल्ससह असलेली आयपी 67 रेटेड हाय-टेक लिथिअम इऑन बॅटरी. ही बॅटरी घरगुती 5-15 एएमपी इलेक्‍ट्रिक आऊटलेट वापरूनही सहज चार्ज होते. यातील इंटेलिजंट बॅटरी मॅनेजमेंट सीस्टम (आयबीएमएस)मुळे चार्ज आणि डिस्चार्ज सहज हाताळले जाते. शिवाय, अत्यंत देखणे होम चार्जिंग स्टेशन अतिशय सुयोग्य दरात उपलब्ध करण्यात आले आहे.

इको, स्पोर्टस्‌ मोड्‌स

चेतकमध्ये दोन ड्राईव्ह मोड्‌स आहेत- (इको, स्पोर्टस्‌) आणि यात रिव्हर्स असिस्ट मोड असल्याने चालकाच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातात. निर्माण होणाऱ्या उष्णतेला गतिशील ऊर्जेत परावर्तित करणाऱ्या इंटेलिजंट ब्रेकिंग सिस्टमच्या माध्यमातून यात रीजनरेटिव्ह ब्रेकिंगची सुविधा असल्याने यातील वैशिष्ट्यांमध्ये वाढ होते.

सर्वसमावेशक माहिती

डेटा कम्युनिकेशन, सेक्‍युरिटी आणि युझर ऑथेंटिकेशन अशा पर्यायांमुळे गाडी बाळगण्याचा आणि ती चालवण्याचा ग्राहकाचा अनुभव सहजसुंदर होतो. यासाठी चेतकमध्ये असे अनेक पूर्णपणे कनेक्‍टेड राहण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. चेतक मोबाईल ऍपमुळे चालकाला आपल्या गाडीबद्दल आणि चालवण्याच्या आधीच्या रेकॉर्डबद्दल सर्वसमावेशक अशी माहिती मिळते. 

Web Title: 95Km once charging Running Bajaj Chetak Market

संबंधित बातम्या

Saam TV Live