समस्त वहिनींचे भावोजी आदेश बांदेकरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 जून 2018

समस्त वहिनींचे भावोजी म्हणजेच आदेश बांदेकरांना सिद्धिविनायक पावलाय. आदेश बांदेकरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळालाय. सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षाला सरकारनं राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिलाय. त्यामुळं भावोजींचं राजकीय वजन आता आणखी वाढलंय.

आदेश बांदेकर हे मातोश्रीच्या अतिशय जवळचे मानले जातात. गेल्या सहा ते सात वर्षापासून आदेश बांदेकर शिवसेनेत सक्रिय आहेत. त्यांना सिद्धीविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं. आता सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षाला राज्यमंत्र्याचा दर्जा दिल्यानं भावोजींचं राजकीय वजन आणखी वाढल्याचं सांगण्यात येतंय.

शिवसेना भाजपवर नाराज आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी ही खेळी तर करण्यात आली नाही ना याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय. 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live