#AadharNiradhar आधार केंद्राचा गजब कारभार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 जून 2018

पुणे - पुणेकरांचे आधारकाष्ठ संपण्याची अद्याप चिन्हे नाहीत. शिवाजीनगर टपाल कार्यालयातील आधार केंद्राने नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी अजबच तोडगा काढला आहे. आधार कार्डमध्ये बदल, तसेच नवीन कार्डसाठी नागरिकांनी सहा ते नऊ या वेळेत येथे नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

नोंदणीनंतर सकाळी दहा वाजता येऊन रांगेत थांबावे लागत आहे. टपाल कार्यालयांतील या प्रकारामुळे नागरिकांवर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती शहरातील बहुतांशी केंद्रांत आहे.

पोस्ट कार्यालयातील आधार केंद्रांमार्फत दिवसभरात फक्त दहा नागरिकांच्या आधारकार्डात बदल केला जातो आणि दोन नागरिकांना नवीन आधारकार्ड काढून दिले जाते. यामुळे नागरिकांकडे चकरा मारण्याव्यतिरिक्त पर्याय राहत नाही. तसेच, तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा केंद्रे बंद असल्याचा अनुभव नागरिकांस येत आहेत.

याबाबत शिवाजीनगर पोस्ट ऑफिस आधार केंद्राचे प्रमुख पोस्टल असिस्टंट श्रीराम कुलकर्णी म्हणाले, ‘‘सकाळी दहा वाजता नागरिकांची गर्दी होत असे. यातून आधी कोण आले, याची छाननी करणे अवघड जाते. तसेच, येथे सकाळी दहा ते दोन या वेळेतच आधार कार्डसंदर्भातील काम करण्यासाठी व्यक्तीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे अतिरिक्त लोकांची नोंदणी करणे अशक्‍य आहे.

दुरुस्तीच्या वेळा योग्य नाहीत. आधी आधारसाठी सकाळी नोंदणी करायला यायला सांगितले. सकाळी यायचे, नावनोंदणी करून परत जायचे, आधारकार्ड काढण्यासाठी परत दहा वाजता यायचे, हे शक्‍य होत नाही. या वेळा बदलायला हव्यात आणि दुरुस्त्यांची संख्याही वाढवायला हवी. 
- चंदूबाई चौगुले, नागरिक

संबंधित बातम्या

Saam TV Live