आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पाठीशी घालणे टाळले

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 जून 2019

मुंबई - महापालिकेच्या अभियंत्यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ झाल्याप्रकरणी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पाठीशी घालणे टाळले. कोणीही काही चुकीचे केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे स्पष्ट करीत पालिका अधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनाही त्यांनी कानपिचक्‍या दिल्या.

आदित्य यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विभागाचे माजी प्रमुख एरिक सोहेम यांच्यासह पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बुधवारी भेट घेतली. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री रामदास कदम, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव होते. या वेळी मिठी नदीच्या सुशोभीकरणाचे सादरीकरण झाले. त्यानंतर आदित्य पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की मिठी, पोयसर आणि दहिसर नदी महत्त्वाची आहे. या नद्या स्वच्छ झाल्यास परिसरातील नागरिकांना फायदा होईल. कला नगर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍समध्ये पाऊस पडल्यानंतर अर्ध्या तासात पाणी भरले होते. आपण वर्षभर पाणी साचण्याची ठिकाणे कमी करता यावीत यासाठी प्रयत्न करतो; मात्र निष्काळजी अधिकाऱ्यांमुळे या ठिकाणांत वाढ होईल, अशी चिंताही ठाकरे यांनी व्यक्त केली.

Web Title: Aaditya Thackeray Activists Politics

संबंधित बातम्या

Saam TV Live