‘साम’वर उद्यापासून ‘आई अंबाबाई’ मालिका

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर - राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य पीठ असलेली श्री अंबाबाई. नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून अंबाबाईची रोजची पूजा, आरती सोहळा घरबसल्या यंदाही पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर माहूरची श्री रेणुका, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, वणीची श्री सप्तशृंगी, मुंबईची श्री महालक्ष्मी आणि पुण्याची चतुःशृंगी या पीठांची महतीही अनुभवायला मिळेल.

कोल्हापूर - राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य पीठ असलेली श्री अंबाबाई. नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून अंबाबाईची रोजची पूजा, आरती सोहळा घरबसल्या यंदाही पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर माहूरची श्री रेणुका, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, वणीची श्री सप्तशृंगी, मुंबईची श्री महालक्ष्मी आणि पुण्याची चतुःशृंगी या पीठांची महतीही अनुभवायला मिळेल.

निमित्त आहे, ‘साम मराठी’ वाहिनीवर बुधवारपासून (ता.१०) प्रसारित होणाऱ्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत ‘आई अंबाबाई’ या मालिकेचे. दरम्यान, ही विशेष मालिका पॉवर्ड बाय मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ अँड ज्वेलर्स असून, को-पॉवर्ड बाय वारणा दूध संघ आहे. चितळे उद्योग समूह, जाधव इंडस्ट्रीज, पितांबरी, द्वारकादास शामकुमार आणि पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंक सहप्रायोजक आहेत.

यंदा या मालिकेचे दहावे वर्ष आहे. देशात ५१ शक्तिपीठे व राज्यातील साडेतीन शक्तिपीठांबरोबर इतर मंदिरांतही नवरात्रोत्सव सोहळा थाटामाटात साजरा होतो. प्रत्येक देवीची महती व तिच्या मंदिराचे वैभव काही न्यारेच आहे.

नवरात्रोत्सवातील परंपराही वेगळी आहे. ही सारी महती वैशिष्ट्यपूर्ण निवेदनातून उलगडणार आहे. १० ते १८ ऑक्‍टोबरदरम्यान दुपारी साडेतीन ते चार या वेळेत ही मालिका प्रक्षेपित होणार आहे. त्याशिवाय अंबाबाई मंदिरातील रोजची आरती व पूजा रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी प्रक्षेपित केली जाणार आहे. प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतून आकर्षक पारितोषिके जिंकण्याची पर्वणी यंदाही असेल.

आकर्षक बक्षिसेही
प्रेक्षकांसाठी यंदाही प्रश्‍नमंजूषा स्पर्धा होणार असून, पाच महाविजेत्यांना श्री अंबाबाईची थ्री डायमेन्शनल प्रतिमा आणि मंदिरात अभिषेकाची संधी दिली जाणार आहे. पाच उपविजेत्यांना अंबाबाईची नथ पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे. पोस्टकार्ड व ‘एसएमएस’द्वारे मालिकेतून विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांची उत्तरे प्रेक्षकांना पाठवायची आहेत. त्यातून लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेते जाहीर केले जातील. त्याशिवाय रोज तीन भाग्यवान विजेते निवडले जाणार आहेत. त्यांना सिल्क साडीचे पारितोषिक असेल.

WebTitle : marathi news aai aambabai special navratri series on saam tv news 


संबंधित बातम्या

Saam TV Live