कृषी प्रदर्शनात दोन-तीन दिवस थांबलो तरच... : आमीर खान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 जानेवारी 2020

बारामती : शिक्षण हे खूप गरजेचे आहे. पानी फाउंडेशनतर्फे आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षित करत आहोत. मी येथे बोलण्यासाठी नाही, तर शिकण्यासाठी आलो आहे. येथे एक दिवसात काहीच कळणार नाही. तीन-चार दिवस थांबलो तर पूर्ण माहिती कळू शकते, असे अभिनेते आमीर खान यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामती : शिक्षण हे खूप गरजेचे आहे. पानी फाउंडेशनतर्फे आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षित करत आहोत. मी येथे बोलण्यासाठी नाही, तर शिकण्यासाठी आलो आहे. येथे एक दिवसात काहीच कळणार नाही. तीन-चार दिवस थांबलो तर पूर्ण माहिती कळू शकते, असे अभिनेते आमीर खान यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कृषिक' या कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनासाठी बारामतीमध्ये @OfficeofUT@dadabhuse, पदुममंत्री सुनील जी केदार, @vishwajeetkadam@aamir_khan या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपली उपस्थिती तोट्यात चाललेल्या शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आहे. pic.twitter.com/Vm4fJRZ1Jd

— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 16, 2020

बारामती अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या बहुचर्चित 'कृषिक 2020'चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता आमीर खान, कृषीमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आदी पदाधिकारी उपस्थित आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबवित असलेले आधुनिक तंत्रज्ञान, शेती व शेतीपूरक व्यवसायाची निगडित सर्व विषयावरची माहिती उपस्थित मान्यवरांना अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

बारामतीच्या कृषी प्रदर्शनाचा आमिरलाही आवरला नाही मोह... 

आमीर खान म्हणाले, की पाण्यापासून सुरवात करण्याचा आम्ही निर्णय घेतला. महाराष्ट्रात राहत असल्याने आम्ही महाराष्ट्रापासून सुरवात केली. त्यामुळे आम्ही पानी फाउंडेशनतर्फे कामास सुरवात केली. गेल्या चार वर्षांपासून आम्ही वॉटर शेड मॅनेजमेंट शिकवत आहोत. गावातील लोकच हे काम करत आहेत. आम्ही फक्त त्यांनी शिकवत आहोत. पाण्याच्या नियोजनाबरोबर आम्ही जमीन, पिक या संदर्भात पाच नव्या गोष्टी शिकविणार आहोत.

Web Title aamir khan visits agriculture exhibition 2020 baramati


संबंधित बातम्या

Saam TV Live