अण्णांसोबतची सरकारची चर्चा पुन्हा फिसकटली; आण्णा हजारेंचं आंदोलन अधिक तीव्र होणार  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 मार्च 2018

सलग सहाव्या दिवशी अण्णांचं उपोषण सुरुच आहे. जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर अण्णा ठाम आहेत. दरम्यान अण्णांसोबतची सरकारची चर्चा पुन्हा फिसकटलीये. दरम्यान आज गडकरी-फडणवीस अण्णांची भेट घेण्याची शक्याता आहे. सहाव्या दिवशीही अण्णांचं रामलीलावरील आंदोलन सुरूच आहे. आंदोलनावर वॉच ठेवला जात असल्याचा आरोप अण्णांच्या समर्थकांनी केलाय. सरकार आणिबाणीसारखी स्थिती निर्माण करीत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. दरम्यान राळेगणसिद्धीमध्ये आज महाआमसभा घेण्यात येणार आहे. या सभेला तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

सलग सहाव्या दिवशी अण्णांचं उपोषण सुरुच आहे. जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर अण्णा ठाम आहेत. दरम्यान अण्णांसोबतची सरकारची चर्चा पुन्हा फिसकटलीये. दरम्यान आज गडकरी-फडणवीस अण्णांची भेट घेण्याची शक्याता आहे. सहाव्या दिवशीही अण्णांचं रामलीलावरील आंदोलन सुरूच आहे. आंदोलनावर वॉच ठेवला जात असल्याचा आरोप अण्णांच्या समर्थकांनी केलाय. सरकार आणिबाणीसारखी स्थिती निर्माण करीत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. दरम्यान राळेगणसिद्धीमध्ये आज महाआमसभा घेण्यात येणार आहे. या सभेला तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. या आमसभेत आंदोलन आधिक तीव्र करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे​.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live