अकोला येथील आम आदमी पक्षाच्या दोन नेत्यांची हत्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 ऑगस्ट 2018

अकोला येथील आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहेमद व बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील शफी कादरी या दोघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. अकोला शहरात 30 जुलै रोजी हत्याकरून त्यांचे मृतदेह हे बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा लगतच्या पाथर्डी घाट परिसरात फेकून देण्यात आले होते. 

पैशाचा पाऊस पाडून देणाऱ्या टोळीचा या हत्येमागे हात असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली असून...आतापर्यंत पाच ते सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकणात अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गेल्या दोन दिवसापासून मेहकर, जानेफळ, साखरखेर्डा परिसरात दोघांचा शोध घेत होते.

मुकीम अहेमद व शफी कादरी यांना अकोला येथे जेवणास बोलावून तेथे 30 जुलै रोजी त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती आहे..

संबंधित बातम्या

Saam TV Live