असा होता आसारामविरोधातला खटला..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 एप्रिल 2018

जोधपूर : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल लागला. आसारामबापूसह तीन आरोपी दोषी व दोघांना निर्दोष सुनावण्यात आले आहे. आसाराम, शिल्पी व शरद हे तिघे या प्रकरणात दोषी ठरवले गेले, तर शिवा आणि प्रकाश हे दोघे निर्दोष असल्याचा निर्णय जोधपूर सत्र न्यायालयाने दिला आहे.

जोधपूर : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल लागला. आसारामबापूसह तीन आरोपी दोषी व दोघांना निर्दोष सुनावण्यात आले आहे. आसाराम, शिल्पी व शरद हे तिघे या प्रकरणात दोषी ठरवले गेले, तर शिवा आणि प्रकाश हे दोघे निर्दोष असल्याचा निर्णय जोधपूर सत्र न्यायालयाने दिला आहे.

या निकालामुळे आज राजस्थान, गुजरात, हरयाणा व उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आसारामची भक्तमंडळी व समर्थक या चार राज्यात मोठ्या प्रमाणात असल्याने गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

बलात्कार प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे - 

1. उत्तर प्रदेशातील शहाजहाँपूर येथील 16 वर्षीय मुलीवर जोधपूर येथील आश्रमात बलात्कार व अत्याचार केल्याप्रकरणी आसारामबापूला 2013 साली अटक करण्यात आली. 

2. आरामबापूला मुलींची तस्करी, बलात्कार, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार या आरोपांखाली अटक केले गेले व यात तो दोषी ठरला. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

3. आसारामबापूला प्रथम इंदोरला अटक करण्याक आली व 1 सप्टेंबर 2013ला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. 

4. गुजरातमध्ये दोन बहिणींनी स्वयंघोषित गुरू आसारामबापू व त्याचा मुलगा नारायण साईच्याविरोधात बलात्काराच्या व अन्य अत्याचाराच्या स्वतंत्र तक्रारी नोंदवल्या. 

5. या दोन घटनांमध्ये मागील चार वर्षांच्या न्यायालयीन सुनावणीत 9 साक्षीदारांवर हल्ले करण्यात आले. यातील 3 साक्षीदार मृत पावले.  

6. 77 वर्षीय आसारामबापूचे तब्बल 12 जामीनअर्ज फेटाळले गेले. यापैकी सहा जामीनअर्ज सत्र न्यायालयाने फेटाळले, तीन जामीनअर्ज राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळले तर तीन जामीनअर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. 

7. जोधपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था यंत्रणा ही चोख ठेवण्यात आली आहे, कारण आसारामबापूचे समर्थक या भागात मोठ्या प्रमाणात उपस्थित असतील. तसेच निर्णय आसारामबापूच्या बाजूने लागला नाही तर परिस्थिती चिघळू शकते. यासाठी अतिरीक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. जोधपूरसह उत्तर प्रदेश, हरयाणा व गुजरात या राज्यातही हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

8. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणामुळेच जोधपूर सत्र न्यायालयाने अंतिम निकाल हा जोधपूर मध्यवर्ती कार्यालयाच्या भागातच सुनावण्याचा निर्णय घेतला होता. 

9. या खटल्यावर निकाल जाहीर करणारे न्यायाधीश मधुसुदन शर्मा यांना सुरक्षिततेच्या कारणामुळे झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live