धुळ्याचं पालकमंत्रिपद देऊन सत्तारांची नाराजी दूर ...

सरकारनामा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

औरंगाबाद : औ. कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा बाळगून असलेल्या अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्रिपद देण्यात आल्यामुळे ते कमालीचे नाराज होते .शिवाय औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाने आपल्याला न विचारता अध्यक्षपद महाविकास आघाडीला देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप देखील सत्तार यांनी केला होता.

औरंगाबाद : औ. कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा बाळगून असलेल्या अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्रिपद देण्यात आल्यामुळे ते कमालीचे नाराज होते .शिवाय औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाने आपल्याला न विचारता अध्यक्षपद महाविकास आघाडीला देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप देखील सत्तार यांनी केला होता.

शिवसेनेकडे अधिकचे संख्याबळ असल्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपलाच असावा अशी भूमिका घेत सत्तार यांनी बंड पुकारले होते. नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या मागील आठवड्यात राज्यभरात पसरल्या होत्या. त्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांच्याशी सत्तार यांचा वाद झाला .हे प्रकरण थेट मातोश्रीवर गेले . त्यानंतर या सगळ्यांना समज देत उद्धव ठाकरे यांनी माघारी धाडले होते .

सत्तार यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देखील करण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण खुबीने हाताळतात सत्तार यांची नाराजी देखील दूर केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काल जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या यादीत अब्दुल सत्तार यांचे नाव असून त्यांच्यावर धुळे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे

जिल्ह्याच्या राजकारणापासून सत्तार दूर

उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठीच त्यांना धुळे जिल्ह्याची जबाबदारी दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तारांचा स्थानिक नेत्यांशी झालेला वाद आणि त्याचा महाविकास आघाडीचे सरकार म्हणून झालेला परिणाम पाहता मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना चार हात लांब ठेवल्याचे बोलले जाते.

गेली पंचवीस-तीस वर्ष काँग्रेसमध्ये काढलेल्या सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण शिवसेनेतील आदेश संस्कृती त्यांच्या पचनी पडली नाही. परिणामी शिवसेनेतील जुन्या-जाणत्या नेत्यांना डावलून जिल्ह्याची सगळी सूत्रे आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न सत्तार करू पाहत होते.  त्याला उद्धव ठाकरे यांनी वेळीच आवर घातल्याचे यावरून स्पष्ट होते.

Web Title -  abdul sattar pacified alloting guardian ministership dhule


संबंधित बातम्या

Saam TV Live