ठाकरे सरकारला पहिलाच मोठा धक्का! अब्दुल सत्तारांचा मंत्रिपदाचा राजीनामा?

ठाकरे सरकारला पहिलाच मोठा धक्का! अब्दुल सत्तारांचा मंत्रिपदाचा राजीनामा?

औरंगाबाद : मंत्रिमंडळ विस्तार होऊन काही दिवसच झाले. त्यातच आता खातेवाटपाचा तिढा निर्माण होतोय. मात्र असं असताना ठाकरे सरकारला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण होतेय. कारण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. दरम्यान रात्री उशिरापर्यंत  मंत्री अर्जुन खोतकर यांनी सत्तार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचंही समजतंय. दरम्यान मी राज्यमंत्री आहे, त्यामुळे किमान माझ्या मतदारसंघातील निर्णय मला घेऊ द्या; जिल्हा परिषदेच्या सदस्यांची भूमिका काय आहे, हे मला समजून घेऊ द्या, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचे शस्त्र बाहेर काढलंय. त्यामुळे शिवसेनेमध्ये खळबळ उडालीय.

मात्र या बातमीला अद्याप काही दुजोरा मिळालेला नाही. तर इकडे अब्दुल सत्तारांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण सेनेचे अनिल देसाईंनी दिलंय. यामुळे तर्क वितर्कांना फाटे निघतायत. एकीकडे चर्चा आहे, कॅबिनेट मंत्रिपद दिलं नाही म्हणून सत्तारांनी राजीनामा दिला असावा असं बोललं जातंय. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या काही मागण्यांमुळे हा निर्णय सत्तारांनी घेतला असल्याचं कळतंय. मात्र ठेस असं कारण अजुनही स्पष्ट असलेलं दिसत नाहीय. 

या सर्व चर्चांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खलबतं होताना दिसतील हे नक्कीच. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्तारांच्याच कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी असा त्यांचा आग्रह असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सत्तार बंड करुन उठले आहेत. अशी महिती आहे. यातच देसाईंकडे सत्तारांनी राजीनामा दिला नाही मग कोणाकडे राजीनामा दिला? किंवा दिलाच नाही. यावर सुद्धा संभ्रमच आहे. त्यामुळे आता नेमकं काय होतंय. हे पाहणं महत्वाचं ठरेल. 

Web Title -  Abdul Sattar resigning Minister post?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com