का झालेत नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्यविरोधात आक्रमक ? वाचा नरेंद्र मोदी यांची EXCLUSIVE मुलाखत..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 एप्रिल 2019

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष मुलाखत सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांनी घेतली आहे. ही मुलाखत उद्या (रविवार) सकाळमध्ये प्रकाशित होत आहे आणि साम वाहिनीवर दाखविली जाणार आहे. केंद्र सरकारच्या अनेक धोरणात्मक बाबींचा उहापोह मोदी यांनी या मुलाखतीत केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरु असताना मराठी मीडियामध्ये मोदी यांनी सर्वप्रथम 'सकाळ'ला मुलाखत दिली आहे. सर्जिकल स्ट्राईक, घराणेशाही, राफेल अशा अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर मोदी यांनी उत्तरे दिली आहेत. 

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढत होत आहे. मोदी विरुद्ध गांधी अशी थेट लढाई होत असताना पुन्हा सरकार येईल का? महाराष्ट्रात एनडीएला किती जागा मिळतील? अलिकडे आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबद्दल आक्रमक झालेले दिसत आहात? बालाकोट हल्ल्याबाबत आपल्याला काय वाटते? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मोदींनी या मुलाखतीत दिली आहेत.

सकाळमध्ये मोदींची ही विशेष मुलाखत उद्या (रविवारी) प्रसिद्ध होणार आहे. अभिजित पवार यांनी मोदींची घेतलेली ही मुलाखत सकाळमध्ये वाचायला, सकाळच्या फेसबुक अकाउंटवर आणि साम टीव्हीवर रविवारी पाहायला विसरू नका.

संबंधित बातम्या

Saam TV Live