नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 8 ठार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झालाय. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सची बस धडकून हा अपघात झालाय. या भीषण अपघातात 8 जण ठार झालेत. ही दुर्घटना औरंगाबादहुन पुण्याला जाताना शिरूर जवळ वाडेगव्हान जवळ पहाटे 5.30 वाजता घडलीये. पोलिस आणि घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे. काही प्रवासी अजूनही बसखाली दबल्याची शंका आहे. दरम्यान, दुर्दैवाची बाब म्हणजे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती.

अपघातानंतर या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. प्रचंड वाहतुकीमुळे घटनास्थळी क्रेनही पोहचू शकत नाहीये. अपघातातील जखमींना शिरूर येथील रुग्णालयात तर, काहींना पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघातस्थळापासून नगर आणि पुणे अशा दोन्ही बाजूला दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

WebTitle : marathi news accident on ahemadnagar pune road eight dead 

संबंधित बातम्या

Saam TV Live