अकोला: पंचगव्हाण फाट्यावर अॅपे उलटून 1 ठार, दोन जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 मे 2018

अकोला (तेल्हारा) : येथून नैराट वैराट येथे स्वयंपाकासाठी जाप असलेल्या अॅपेला पंचगव्हाण फाटा येथे शुक्रारी रात्री अपघात झाला. अॅपे उलटल्याने एक ठार झाला तर दोन जखमी आहेत.

अकोला (तेल्हारा) : येथून नैराट वैराट येथे स्वयंपाकासाठी जाप असलेल्या अॅपेला पंचगव्हाण फाटा येथे शुक्रारी रात्री अपघात झाला. अॅपे उलटल्याने एक ठार झाला तर दोन जखमी आहेत.

नातेवाईकाकडे लग्नसमारंभात स्वयंपाक करण्यासाठी एम.एच. ३० ए.एफ. २००३ या क्रमांकाच्या अॅपेने नैराट वैराट जात असताना पंचगव्हाण जवळ अॅपे पलटला. यात हरिदास रामराव कुकडे (३४, रा. इंदिरा नगर तेल्हारा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अॅपेतील सुनीता अनिल मोरे (३०, रा. प्रताप चाैक) महिलेसह आणखी एक महिला जखमी झाली. जखमीवर पंचगव्हाण येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपाचर करून पुढील उपचारासाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

संबंधित बातम्या

Saam TV Live