मदतकार्य करण्याऐवजी लोकांनी पळवले बिअरचे बॉक्स 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

अपघात झाला की पहिल्यांदा मदतीसाठी लोकं धावतात हा सर्वसाधारण अनुभव आहे. पण औरंगाबाद जिल्ह्यातल्या आडुळ गावाजवळ एका ट्रकला अपघात झाला आणि तिथं मदतकार्य करण्याऐवजी पळवापळवी सुरू झाली. कारण त्या ट्रकमध्ये होती बिअर. धुळे सोलापूर हायवेवर आडुळ गावाजवळ बिअर घेऊन जाणारा ट्रकला अपघात झाला. रस्त्याच्या शेजारी उलटलेल्या ट्रकमध्ये बिअरचे बॉक्स होते. अपघात झाल्यानंतर मदतकार्य करण्याऐवजी स्थानिक लोकांनी बिअरचे बॉक्स पळवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अपघातातल्या जखमी ड्रायव्हर आणि क्लिनरकडं कुणाचंही लक्ष नव्हतं.

अपघात झाला की पहिल्यांदा मदतीसाठी लोकं धावतात हा सर्वसाधारण अनुभव आहे. पण औरंगाबाद जिल्ह्यातल्या आडुळ गावाजवळ एका ट्रकला अपघात झाला आणि तिथं मदतकार्य करण्याऐवजी पळवापळवी सुरू झाली. कारण त्या ट्रकमध्ये होती बिअर. धुळे सोलापूर हायवेवर आडुळ गावाजवळ बिअर घेऊन जाणारा ट्रकला अपघात झाला. रस्त्याच्या शेजारी उलटलेल्या ट्रकमध्ये बिअरचे बॉक्स होते. अपघात झाल्यानंतर मदतकार्य करण्याऐवजी स्थानिक लोकांनी बिअरचे बॉक्स पळवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अपघातातल्या जखमी ड्रायव्हर आणि क्लिनरकडं कुणाचंही लक्ष नव्हतं. पण शेवटी बिअरचा सोस नसलेल्या गर्दीतल्या काही माणसांनी शेवटी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live