भयंकर! कोरोनापासून वाचण्यासाठी गुजरातला पायी निघालेल्यांना टेम्पोनं चिरडलं...

मोहिनी सोनार
शनिवार, 28 मार्च 2020

कोरोनापासून बचाव करता यावा यासाठी प्रत्येक जण आपापल्या परिने प्रयत्न करतोय. मात्र हा प्रयत्न कधी कधी जीवावरही बेतू शकतो, हे लोक विसरुन जातात. अशीच एक घटना घडलीय, मुंबई अहमदाबाद महामार्गावर. 

 

कोरोनापसून वाचण्यासाठी वसईहून अहमदाबादला जाण्यासाठी पूर्ण कुटूंब निघालं होतं. आणि ते ही पायी. देशात सध्या लॉकडाऊन आहे. यामुळे हे सर्व प्रवासी आपल्या घरी गुजरातच्या दिशेने पायी निघाले होते.  मात्र गुजरातची हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आलं होतं. आणि परतीच्या वाटेनं परतताना त्यांच्यावर काळानं घाला घातलाय. मुंबई अहमदाबाद महामार्गावर त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 2 जण गंभीर जखमी झालेत.

परत वसईच्या दिशेने येत असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली आहे.आणि यात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. कल्पेश जोशी आणि मयांक भट या दोघांची ओळख पटली असून पोलिस सध्या अजून तपास करत आहे. 

ही भयंकर घटना घडल्यानं लोकांनी घाबरुन जाऊ नये. कोरोना बरा होऊ शकतो. अशी जनजागृती करण्यात येतेय. तरी सुद्धा लोक वाटेल ते प्रयत्न करुन आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करतायत. त्यातच वेगवेगळ्या अफवांमुळे लोकांमध्ये खोट्या बातम्या पसरवल्या जातायत. या अफवांचा बळी हे कुटुंबीय ठरले आहेत.

 दरम्यान अशीच एक घटना घडलीय कोल्हापूरमध्येही. एका वयोवृद्ध महिलेनं कोरोनाच्या भीतीनं नदीत उडी घेऊन आत्महत्या केलीय. माझ्यामुळे कोणाला कोरोना नको, असं म्हणत त्या महिलेनं आत्महत्या केली. 

त्यामुळे लोकंनी अशा खोट्या अफवांना बळी पडू नये. हेच सांगण्यात येतंय.

Web Title - marathi news accident on mumbai gujrat highway 


संबंधित बातम्या

Saam TV Live