एसीपी कोळेकरांचे व्हेंटीलेटर काढले 

एसीपी कोळेकरांचे व्हेंटीलेटर काढले 

औरंगाबाद - मोतीकारंजा परिसरात दंगलग्रस्त परिस्थिती हाताळताना दगडफेकीत गंभीर जखमी झालेले सहायक पोलिस आयुक्‍त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृतीत सुधारणा होत असुन त्यांची कृत्रीम श्‍वाच्छोस्वासाची प्रणाली बुधवारी काढण्यात आली आहे. औषधोपचाराला प्रतिसाद देत आहेत. मात्र स्वरयंत्रावरील सुज उतरायला किमान दोन आठवडे लागणार असल्याचे मुंबई येथील बॉम्बे हॉस्पीटलच्या प्रवक्‍त्यांनी सकाळ शी बोलतांना सांगितले. 

शुक्रवारी (ता. 11) रात्री दगडफेकीत एसीपी कोळेकर यांच्या कंठावर गंभीर इजा झाली होती. त्यानंतर शनिवारी (ता.12) त्यांच्या स्वरयंत्राची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असे वाटले होते; मात्र उपचारास त्यांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने रविवारी (ता. 13) त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्याची निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी (ता.14) त्यांना चिकलठाणा विमानतळावरून एअर ऍम्ब्युलन्सने (व्हीटीआरएसएल) बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे अस्थिव्यगोपचार विभागाचे विभागप्रमुख डॉ. एम. एल. सराफ यांचे पथक त्यांच्यावर उपचार करित असुन त्याच्या तब्बेतील सुधारणा बोत आहे. त्यांना सध्या बोलणे शक्‍य नसल्याने ते लिहुन संवाद साधण्याचा प्रयत्न करित असल्याचे पोलीस उपायुक्त दिपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले. 

एसीपी कोळेकर सध्या औषधोउपचाराला प्रतिसाद देत आहे. त्यांचे व्हेंटीलेटर काढण्यात आले आहे. मात्र त्यांच्या स्वर यंत्रावरील सुज कमी झालेली नाही. ती उतरण्यासाठी दोन आठवड्यांचा कालवधी लागण्याची शक्‍यता आहे. 
-डॉ. सागर साकळे, सहाय्यक वैद्यकीय अधिक्षक, बॉम्बे हॉस्पीटल, मुंबई

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com