भाजपतर्फे निकालानंतर पक्षातर्गंत विरोधकांवर कारवाई - गिरीश महाजन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 मे 2019

जळगाव : लोकसभा निवडणूकीत राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या काही जणांनी पक्षाचे काम केलेले नाही.त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, असा प्रस्ताव राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत मांडला. विशेष म्हणजे सर्वच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला सहमती दर्शविल्याचे माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता निकालानंतर भाजपमध्ये कारवाईरुपी 'त्सुनामी' येण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या एक्‍झीटपोलच्या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. २१) मुंबईत राज्यातील आमदार, खासदार व जिल्हाध्यक्षांची बैठक आयोजित केले होती. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बोलतांना, म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या काही जणांनी पक्षाच्या विरोधात काम केले, तर काही जणांनी कामच केलेले नाही. या बाबत नगर, नंदुरबार तसेच नाशिक येथील पक्षातील बंडाचा तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम न केल्याचाही हवाला दिला. पक्षाचा आदेश न मानणारे व पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, असा प्रस्तावही त्यानी मांडला. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून मंत्री महाजन यांच्या प्रस्तावाला पाठींबा दर्शविला. 

मंत्री महाजन यांच्या प्रस्तावामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात पक्षविरोधी कारवाई करणारे तसेच पक्षाचे काम न करणाऱ्यावर कारवाई होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे कारवाईचा हा हंटर कोणा-कोणावर चालणार याकडेही आता लक्ष असणार आहे

web tittle:  Action by the BJP on the internalopposition after the results

संबंधित बातम्या

Saam TV Live