अत्यावश्यक सेवेतही गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई, इतके कर्मचाऱी बडतर्फ

साम टीव्ही
बुधवार, 1 जुलै 2020

अत्यावश्यक सेवेतही गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेस्टने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्य़ंत 30 कर्मचाऱ्यांना बेस्टने नारळ दिलाय.  अत्यावश्यक सेवेकरींना वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी कामावर हजर राहण्याचे आदेश बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आहेत.

मुंबई : अत्यावश्यक सेवेतही गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेस्टने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्य़ंत 30 कर्मचाऱ्यांना बेस्टने नारळ दिलाय.  अत्यावश्यक सेवेकरींना वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी कामावर हजर राहण्याचे आदेश बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आहेत.

आदेश मिळूनही गैरहजर राहणाऱ्या एकूण ३० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत बेस्टने बडतर्फ केलंय. गेल्या आठवडय़ापासून ही कारवाई सुरू आहे. सोमवारी आणखी १२ कर्मचाऱ्यांवर कारवाईची कु ऱ्हाड कोसळली. यामध्ये चालक, वाहक, वाहतूक निरीक्षक आणि अन्य कर्मचारी आहेत. तर दुसरीकडे मुंबई पोलिस दलातील 6 पोलिस शिपायांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नोटीस देऊनही गेल्या 2 महिन्यांपासून हे पोलिस शिपाई कामावर आले नसल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

मुंबईत दिवसभरात ९०३ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ७७ हजार १९७ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात करोनाचे ६२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ४४ हजार १७० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

णे शहरात कोरोनातुन ठणठणीत बरे झालेल्यांची एकूण संख्या १० हजार पार गेलीय. एकूण पुणे जिल्ह्याची आकडेवारी काय आहे

नाशिक शहरातील 134 रुग्णांसह जिल्ह्यात दिवसभरात 208 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडलीये. तर 4 रुग्णांचा मृत्यू झालाय. यात मालेगावातील 28 आणि ग्रामीण भागातील 46 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 4 हजार 270 वर पोहचली. यापैकी 2340 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर आत्तापर्यंत 238 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात दररोज हजारोंच्या संख्येनं रुग्णवाढ होतीय. गेल्या देशात 24 तासात तब्बल  18 हजार 653 कोरोना रुग्णांची भर पडलीय. त्यामुळे देशात आता कोरोनाचे एकूण 5 लाख 85 हजार 493 रुग्ण असून त्यापैकी 3 लाख 47 हजार 979 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केलीय. सध्या देशभरात 2 लाख 20 हजार 114 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल एका दिवसात देशात 507 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर आतापर्यंत देशात एकूण 17 हजार 400 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतलाय. 

अशातच लोक काम करण्यासाठी घाबरतायत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने अशी पाऊलं उचलल्यानं कर्मचारी मोठ्या पेचात आहेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live