देशाच्या सुरक्षेसाठी मोदी शहांचा ऍक्शन प्लॅन; पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली 

देशाच्या सुरक्षेसाठी मोदी शहांचा ऍक्शन प्लॅन; पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली 

बालाकोट हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं देशाच्या सुसज्जतेसाठी आणखी एक पाऊल उचललंय. यासाठी मोदी-शहांनी एक ऍक्शन प्लॅन तयार केलाय. 2020 पर्यंत प्रत्येक सुखोई विमान ब्राह्मोस क्षेपणास्त्रानं सुसज्ज असेल. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड आणि ब्रह्मोस एयरोस्पेस लिमिटेडवर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. 

भारत आणि रशियानं एकत्रितपणे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मस्कवा या नद्यांच्या नावांवरून या क्षेपणास्त्राला ब्राह्मोस हे नाव देण्यात आलंय. त्याची अफाट क्षमता पाहिल्यास ते भारताचं ब्रह्मास्त्रच आहे असं म्हणता येईल. ब्राह्मोस हे रडारला चकवा देणारं सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. ते पाणबुडीतून, जहाजातून, विमानातून किंवा जमिनीवरूनही डागता येऊ शकतं. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांची नौदलं एजिस कॉम्बॅट सिस्टम ही अद्ययावत यंत्रणा वापरतात. त्यात कॉम्प्युटर आणि रडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रूच्या शस्त्राचा बिमोड करता येतो. या यंत्रणेला टक्कर देण्याची ताकद ब्राह्मोसमध्ये आहे. 

हे झालं ब्राह्मोसच्या बाबतीत. मोदी शहांनी देशाची राजधानी नवी दिल्लीच्या सुरक्षेसाठीही एका ऍक्शन प्लॅन तयार केलाय. दिल्लीला अभेद्य सुरक्षा देण्यासाठी भारत अमेरिकेकडून नॅशनल एडवान्स्ड सरफेस टू एअर मिसाइल सिस्टीम खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.. ही सिस्टीम दिल्लीत तैनात केल्यानंतर शत्रूला मिसाइल, ड्रोन आणि विमानानं हल्ला करणं शक्य होणार नाही. जरी हल्ला झाला, तरीही तो या यंत्रणेच्या माध्यमातून लागलीच निष्क्रिय करता येणार आहे. 

भारताचा हा ऍक्शन प्लॅन म्हणजे पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. पुलवामा हल्ल्यानंतर पाकच्या कुरघोड्या रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी आक्रमक झालेत. यावेळी मोदींच्या जोडीला आहेत त्यांचे खंदे सहकारी अमित शहा. निवडणुकीचं मैदान असो वा राजकारणाचा आखाडा, यश हमखास ठरलेलंच. त्यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी आखलेला हा नवा अँक्शन प्लॅन पाहून पाकला चांगलाच घाम फुटणार हे वेगळं सांगायला नको.

WebTitle : marathi news action plan of narendra modi and amit shah for the security of the nation 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com