नागरिकत्व कायद्याला विरोध केल्यामुळे या अभिनेत्याला मालिकेतून काढलं...

नागरिकत्व कायद्याला विरोध केल्यामुळे या अभिनेत्याला मालिकेतून काढलं...

नागरिकत्व कायद्याला विरोध केल्यामुळे, अभिनेता सुशांत सिंहनं सावधान इंडिया मालिका गमावलीय. 

सोमवारी मुंबई विद्यापीठात विद्यार्थी संघटनांनी जामिया मिलिया इस्लामियातील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. छात्रभारती, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी तसेच इतर संघटना,पुरोगामी आणि संविधानवादी विद्यार्थी संघटना निषेध करण्यासाठी आंदोलनात सामील झाल्या होत्या. या आंदोलनात अभिनेता सुशांत सिहं सहभागी झाला होता

या कायद्याला  देशभरातून विरोध होतोय. ईशान्य भारतासह, लखनौ, दिल्ली, मुंबई सगळीकडे विद्यार्थी रस्त्यावर उतरतायत. त्या विरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनात अभिनेता सुशांत सिंह सहभागी झाला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याचं सावधान इंडिया सिरीअलचं काम काढून घेण्यात आलंय. सोशल मीडियावर सध्या सुशांतच्या बाजूनं अनेकजण उभे राहतायत.

सुशांत सिंह या शोचं सूत्रसंचालन २०११ सालापासून करत होता. त्याने आज ट्विटरवरून माहिती दिली की त्याची शोमधून हकालपट्टी झाली आहे. सुशांत सिंह नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात बोलत होता. त्याने या कायद्याचा निषेध केला होता. तसेच जामिया मिलियातील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचादेखील निषेध केला होता.

And, my stint with Savdhaan India has ended.

— सुशांत सिंह sushant singh سوشانت سنگھ (@sushant_says) 1576531527000

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com