सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूची बारावी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी, मिळविले एवढे गुण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 मे 2019

पंढरपूर : सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने बारावी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत 82 टक्के गुण मिळविले आहेत.

सैराटच्या यशानंतर मुळची अकलूजची असलेली रिंकू राजगुरू बारावीची परीक्षा दिल्याने पुन्हा चर्चेत आली होती. आता तिला किती गुण मिळणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. अखेर आज (मंगळवार) बारावीचा निकाल जाहीर झाला असून, तिने 82 गुण मिळविले आहेत. रिंकूचा नुकताच कागर चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, त्या चित्रपटाला यश मिळाले नव्हते. अखेर तिला परीक्षेत यश मिळाल्याने तिला समाधान मिळाले आहे.

रिंकू 600 पैकी 533 गुण मिळवत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. मोंडनिंब येथील जय तुळजाभवानी ज्युनिअर महाविद्यालयामध्ये तिने परीक्षा दिली होती. तिला मराठी आणि इतिहासात 100 पैकी 86 गुण मिळाले आहेत. तर, इंग्रजीमध्ये ५४ मार्क मिळाले आहेत.

Web Title: actress Rinku Rajguru gets 86 percentage in HSC exam

संबंधित बातम्या

Saam TV Live