उपमुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 जून 2019

मुंबई - युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार असून, लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आठवडाभर आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

आदित्य ठाकरे युवासेनेचे अध्यक्ष झाल्यापासून सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत. युवासेनेने लोकसभा निवडणुकीतही चांगले काम केल्याने उद्धव आदित्य यांच्यावर खूष आहेत, यामुळे आदित्य यांना लॉन्च करण्याची हीच योग्य वेळ असल्याची त्यांची धारणा झाली आहे.उपमुख्यमंत्रि-पदासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावांचीही जोरदार चर्चा होती. मात्र शिवसेनेतून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झालेले नेते पक्ष सोडून गेल्याने ठाकरे कुटुंबातील आदित्यला उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

अमित शहा, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत आदित्यच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते आहे. म्हणूनच अवजड खात्यामुळे नाराज झालेल्या उद्धव यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली नव्हती.

web tittle- Aditya Thackeray Deputy Chief Minister?

संबंधित बातम्या

Saam TV Live