डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात धक्कादाय माहिती समोर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 जुलै 2019

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना आत्महत्या करण्यापूर्वी पायल यांनी लिहिलेल्या पत्राबद्दल माहिती होती आणि आरोपींनी हे पत्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती या प्रकरणातील डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबियांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. एएनआयने या संदर्भातील ट्विट केले आहे. या तिन्ही आरोपी डॉक्टरांकडून जप्त करण्यात आलेल्या त्यांच्या मोबाईलमध्ये या पत्राची स्क्रिनशॉट मिळाली आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेनेही याला दुजोरा दिला असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. 

डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्यावर करण्यात येत असलेल्या जातीवाचक टीकेची माहिती दिली होती. त्याचबरोबर आरोपी डॉक्टरांची नावेही या पत्रामध्ये लिहिली होती, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. आरोपी डॉक्टरांच्या मोबाईलमध्ये या पत्राची स्क्रिनशॉट मिळाल्याने आता पोलिसांनी तिन्ही आरोपी डॉक्टरांविरोधात भारतीय दंडविधान संहितेतील कलम २०१ नुसार पुरावे नष्ट करण्याचा गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जामिनाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने २४ जूनला फेटाळली होती.

Web Title: Advocate Gunaratna Sadavarte appearing for Dr Payal Tadvis family said it has been proved that 3 accused were aware of suicide note

संबंधित बातम्या

Saam TV Live