यंदाच्या दिवाळीत कोकणात जा विमानाने

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

कोकणी माणूस आतापर्यंत आकाशातूनच विमान पाहत होता. कोकणावरून घिरट्या घालून जाणारी विमानं कोकणात कुठंच उतरत नव्हती. गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाचं स्वप्न पाहणाऱ्या कोकणवासियांचं स्वप्न पूर्ण होतंय. कोकणातल्या चिपी विमानतळाचं काम जवळपास पूर्ण झालंय. 12 सप्टेंबरला विमानाची ट्रायलही होणार आहे.

विमान उड्डाणासाठी धावपट्टी तयार असली तरी विमानतळावर अनेक सोईसुविधा अजूनही तयार झालेल्या नाहीत. त्यामुळं प्रवासी वाहतूक सुरू होण्याबाबत स्थानिक साशंक आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवाला विमानानं जाण्याची संधी हुकली तरी दिवाळी आणि शिमगोत्सवाला तर विमानानं जाण्याचं चाकरमान्यांचं स्वप्न हमखास पूर्ण होईलच अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत कोकणातल्या विमानप्रवासाची स्वप्न पाहायला हरकत नाही.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live