चार वर्षांत मुंबई आणि उपनगरात परवडणारी 9 लाख 50 हजार घरं बांधण्याचं उद्दिष्ट 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

देशातील प्रत्येकाला हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुंबई आणि उपनगरात तब्बल चार लाखांहून अधिक तर नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार आदी महापालिकांच्या हद्दीत 4 लाख 76 हजारांहून अधिक घरे पुढील चार वर्षांत बांधण्याचे उद्दिष्ट आहे. या दोन्ही भागांत मिळून 9.5 लाख घरे तयार होणार आहेत. सुमारे 322 चौ. फूटांच्या घराची किंमत सरासरी 10 ते 12 लाख रुपयांच्या आसपास असेल. प्रत्येक घराला केंद्र व राज्य सरकारचे मिळून अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पात म्हाडावर नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

देशातील प्रत्येकाला हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुंबई आणि उपनगरात तब्बल चार लाखांहून अधिक तर नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार आदी महापालिकांच्या हद्दीत 4 लाख 76 हजारांहून अधिक घरे पुढील चार वर्षांत बांधण्याचे उद्दिष्ट आहे. या दोन्ही भागांत मिळून 9.5 लाख घरे तयार होणार आहेत. सुमारे 322 चौ. फूटांच्या घराची किंमत सरासरी 10 ते 12 लाख रुपयांच्या आसपास असेल. प्रत्येक घराला केंद्र व राज्य सरकारचे मिळून अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पात म्हाडावर नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई व आसपासच्या परिसरात मोठ्या संख्येने परवडणारी घरे उपलब्ध होतील. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live