बापरे! कोरोना नंतर आता सारी या रोगामुळे एकाचा मृत्यू तर 14 जणांना सारीची लागण

साम टीव्ही
मंगळवार, 31 मार्च 2020

कोरनामुळे सर्व हैराण तर झालेच आहेत त्यातच आता एका नव्या आजारानं डोकं वर काढलंय. या आजाराचं नाव सारी असं आहे.

 

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच याच आजारासारखी लक्षणे असलेल्या सारी या आजारामुळे औरंगाबादकर धास्तावलेत. या आजारामुळे औरंगाबादमध्ये एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सारीच्या रुग्णांमध्येही कोरोनासारखीच लक्षणे आढळत असल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावलीय. आतापर्यंत १४ जणांना सारीचा आजार झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. मात्र घराच्या बाहेर न पडता घरात राहूनच स्वतःची तसंच कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केलंय. तसंच सारी हा संसर्गजन्य आजार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

त्यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झालीय. हा आजार नेमका काय होतोय कशामुळे आहे किंवा त्यावर उपाय काय आहेत याची माहिती डॉक्टारांनी दिलीय. त्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा...

 


संबंधित बातम्या

Saam TV Live