देशात दर 33 सेकंदाला एक जण हृदयविकाराच्या विळख्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 जून 2019

मधुमेहाचे बोट धरून येणाऱ्या हृदयविकाराची लक्षणे दिसत नाही. यामुळे हा गोड आजार असलेल्यांनी हृदयाची विशेष काळजी घ्यावी. देशात दर ३३ सेकंदाला एक जण हृदयविकाराच्या विळख्यात सापडत असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी शुक्रवारी दिली.

निमित्त होते, शनिवारपासून सुरू होणाऱ्या ‘बेस्ट ऑफ कॉर्डिऑलॉजी’ परिषदेचे. हृदयविकार रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, वयस्कांच्या या आजाराने आता तिशीत दस्तक दिली आहे. ३० टक्के रुग्ण हे चाळीशीतील असल्याचे वास्तव डॉ. हरकुट यांनी सांगितले. त्यामुळेच या आजारावर जागृती करीत देशभरातील तज्ज्ञांचे ज्ञान अद्ययावत व्हावे या हेतूने इंडियन कॉर्डिऑलॉजी सोसायटीतर्फे दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

परिषदेत प्रसिद्ध हृदयविकारतज्ज्ञ डॉ. सुरेंद्र देवरा, डॉ. प्रशांत अडवाणी, डॉ. चेतन लांजेवार, डॉ. एच. एम. हिरेमठ, डॉ. नितीन देशपांडे, डॉ. आशीष नाबर, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. पंकज राऊत, डॉ. निधीश मिश्रा, डॉ. जोनाथन क्रिस्टोफर, डॉ. बी. के. शास्त्री, डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्यासह देशभरातील प्रख्याक हृदयरोगतज्ज्ञ विचार व्यक्त करणार असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अनुज सारडा यांनी पत्रकारांना सांगितले. ज्येष्ठ हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. अजिज खान उपस्थित होते.

WebTitle : marathi news after every 33 seconds heart patient found in India

संबंधित बातम्या

Saam TV Live