आघाडीचं काही ठरेना! बैठक होऊनही सेना अजून खोळंबलेलीच...

after meeting of ncp and congress shivsena still waiting.
after meeting of ncp and congress shivsena still waiting.

पुणे : विधनासभा निवडणूक ही आघाडी म्हणून लढल्याने सरकार स्थापनेबाबत कॉंग्रेसशी चर्चा करणार आहोत. त्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक होईल. त्यानंतर पुढे बैठक घेऊन निर्णय जाहीर करू,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी स्पष्ट केले. राज्यातील लवकरच पर्यायी सरकार स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, आयत्यावेळी भाजपसोबत जाणार का ? या प्रश्‍नाचे उत्तर मलिक यांनी टाळले.

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक आज पुण्यात झाली. पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर मालिक यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

कॉंग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढविली असल्याने आम्ही कॉंग्रेसला सोबत घेऊनच सरकार स्थापन करणार आहोत, असे मलिक यांनी स्पष्ट केले. आजच्या बैठकीत सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करतील.

या बैठकीत सरकार स्थापनेबाबत निर्णय होईल. त्यानंतर मंगळवारी कॉंग्रेस नेत्यांसोबत चर्चा होईल, असे मलिक यांनी स्पष्ट केले. सत्ता स्थापनेबाबत आज महत्वाचा निर्णय होईल, असी शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेचे पदाधिकारीदेखील या बैठकीकडे डोळे लावून बसले होते.

हे ही पाहा...

Web Title - after meeting of ncp and congress shivsena still waiting.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com