मोदींच्या घोषणेनंतर 3 मेपर्यंत संपूुर्ण देशात रेल्वेही बंद राहणार...

साम टीव्ही
मंगळवार, 14 एप्रिल 2020

तप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याच्या घोषणेनंतर भारतीय रेल्वेनंही सर्व प्रवासी सेवा 3 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याच्या घोषणेनंतर भारतीय रेल्वेनंही सर्व प्रवासी सेवा 3 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे संपूर्ण देशात आता रेल्वेही 3 मेपर्यंत बंदच राहणार आहेत. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई लोकलसह देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. आता ही सेवा आणखी 19 दिवस म्हणजेच 3 मेपर्यंत बंद राहणार आहे. 

पाहा सविस्तर व्हिडीओ - 

14 एप्रिलनंतर केद्र व राज्य सरकार लॉकडाऊन वाढविणार की टप्प्याटप्पयाने यामध्ये शिथिलता आणणार, याबाबत सध्या कोणतेही निश्चित धोरण नाही. विभागामध्ये या दोन्ही संभाव्य बाबींची परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊनबाबत प्रशासकीय तयारी ठेवावी. ग्रामीण भागातील पाण्याचे रोटेशनप्रमाणे योग्य वाटप होईल, याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.


संबंधित बातम्या

Saam TV Live