दीड महिना उलटून गेल्यानंतरही मराठवाडा विदर्भाकडे पावसाची पाठ

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 जुलै 2019

पाऊस पडतोय खरा, पण हवा तिथे पडतच नाहीए. मराठवाडा आणि वदर्भाकडे पावसाने पाठ फिरवीय. पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेल्यानंतरही राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे आणि नाशिक वगळता राज्यातील तब्बल 24 जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झालाय.

मराठवाड्यात सरासरीपेक्षा 31 टक्के, तर विदर्भात 30 टक्के कमी पाऊस झालाय. पावसाअभावी या जिल्ह्यांमध्ये पेरण्या खोळंबल्यात. राज्यात सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील भागात पाऊस आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 15 टक्के अधिक पावसाची नोंद झालीय. मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस आहे. 

  • अहमदनगर (८ टक्के) 
  • पुणे (७५ टक्के) 
  • सातारा (२१ टक्के)
  • कोल्हापूर (२६ टक्के)

या जिल्ह्यांत जादा पावसाची नोंद झाली आहे़ 

  • सोलापूर (-५० टक्के) 
  • सांगली (-१५ टक्के) 

येथे पावसाची मोठी तूट आहे. 

उत्तर महाराष्ट्रात केवळ नाशिक जिल्ह्यात २१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून, 

  • नंदुरबार (- ३६ टक्के)
  • जळगाव (-१७ टक्के)
  • धुळे (-१६ टक्के) 

हे जिल्हे कोरडेच आहेत.

राज्यात पावसास सध्या अनुकूल स्थिती नाही. दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात सध्या पावसाच्या दृष्टीनं अनुकूल स्थिती नसल्यानं मराठवाडा आणि विदर्भात सध्या मोठ्या पावसाच्या दृष्टीनं अनुकूल परिस्थिती नाही. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील खरीप पेरण्योंवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

WebTitle : marathi news after one and half month no rain in marathwada and vidarbha 

संबंधित बातम्या

Saam TV Live