घर आणि वाहन खरेदी महागणार; मद्याचेही दर गगनाला भिडणार ?

राजू सोनावणे, साम टीव्ही, मुंबई
गुरुवार, 20 जून 2019

तुम्हाला जर घर किंवा वाहन खरेदी करायची असेल तर तातडीनं करुन टाका, कारण अवघ्या काही महिन्यात घर खरेदी आणि वाहन खरेदी महागणार आहे. विधानसभेच्या निवडणुकांनंतर राज्यात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

घर तसंच वाहन खरेदीशी संबंधित मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि इतर फी वाढण्याची शक्यता आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये यासंबंधी कोणतीही कल्पना देण्यात आली नसली तरी संबंधित विभागाच्या अहवालात घर आणि वाहन खरेदी महागणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय.

आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी मद्याचेही दर वाढवण्याचं प्रस्तावित असल्याचं समजतंय. विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे, त्यामुळं निवडणुकीनंतरच दरवाढ करण्यात येईल असं मानलं जातंय.

WebTitle : marathi news after vidhansabha election inflation in maharashtra may increase

संबंधित बातम्या

Saam TV Live