मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 जुलै 2019

मुंबई : गेल्या 3 दिवसांपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा जोर रात्रीपासून वाढला असून मुसळधार पावसामुळे गोवंडीतील शिवाजी नगर परिसरातील एका घराचा काही भाग कोसळला आहे.या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले आहेत. रात्री सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. रात्री झोपेत असताना अचानक घराचा काही भाग झोपलेल्या लोकांच्या अंगावर कोसळून ते जखमी झाले. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील पाच जण किरकोळ जखमी आहेत तर झुबेदा सय्यद वय 70, आयेशा सय्यद वय 21, नूरजहाँ सय्यद वय 45 यांना अधिक मार लागला असून त्यांना उचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुन्हा पाणी साचलं
मुंबईत रात्री पासूनच पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा एकदा गांधी मार्केट आणि किंग सर्कल परिसरात पाणी साचलं असून यामुळे वाहतूक मंदावली आहे. या परिसरातील वाहतूक कोंडीमुळे गांधी मार्केट मार्गावरील बेस्ट बस ही भाऊ दाजी मार्ग तर सायन मार्ग क्रमांक 24 वरील बेस्ट बसेस या मार्ग क्रमांक 3 वरून वळवण्यात आल्या आहेत.

Web Title: Again Heavy Rains in Mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live