कृष्णेत कोयनेतून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मांजरीत रास्ता रोको

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मे 2019

मांजरी -  कृष्णा नदीत कोयना जलाशयातून चार टीएमसी पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी आज सकाळी परिसरातील ग्रामस्थांनी चिक्कोडी - मिरज मार्गावर रास्ता रोको केला. यामध्ये मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी, अंकली गावातील ग्रामस्थ सहभागी झाले. 

गेल्या दोन महिन्यापासून कृष्णेचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे. यामुळे चिक्कोडी उपविभागातील चिक्कोडी, अथणी, रायबाग तालुक्या बरोबरच विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाव लागत आहे. कर्नाटक - महाराष्ट्र सीमावर्ती भागात राजापूर येथे महाराष्ट्राच्या हद्दीत बंधारा असून त्या पलीकडे कृष्णेत मोठया प्रमाणात मुबलक पाणीसाठा असून कोयना जलाशयातून चार टीएमसी पाणी कर्नाटकाच्या वाट्याला प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात सोडण्याचा करार असून देखील महाराष्ट्र पाणी सोडण्यासाठी अद्याप तयार नाही. यासाठी आज ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. जोपर्यंत कृष्णेत पाणी येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील,  असा इशारा देण्यात आला आहे. 

Web Title : marathi news agitation of villagers for water on chikkodi manjari highway

संबंधित बातम्या

Saam TV Live