अहमदनगरमध्ये झालेल्या हाणामारीत एक ठार 11 जण जखमी; 51 जणांविरोधात गुन्हा दाखल 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या कळस पिंपरी गावात गायरान जमिनीच्या वादातून दोन गटात मारामारी झालीय. यात एकाचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झालेत. दरम्यान याप्रकरणी 51 जणांच्या विरोधात पाथर्डी तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी गावात अनेक वर्षांपासुनची गायरान जमिन होती. या जमिनीत कंस पवार यांचे कुटंब शेती करत होते. मात्र या जमिनीत जलसंधारणाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी पाथर्डी पोलिस ठाण्यात अर्ज दिला. तरीही कुठलिही कारवाई न झाल्याने जलसंधारणाचे काम करण्यासाठी ग्रामस्थांनी थेट गायरान जमिनीतच जेसीबी नेला. पिकवलली शेती उध्वस्त होऊ नये म्हणून पवार कुटुंबीयांनी ग्रामस्थांना विरोध केला. यावेळी दोन्ही गटात जबर हाणामारी होऊन तब्बल 11 जण जखमी झालेत.

जखमींपैकी कंस पवार हे गंबीर जखमी झाल्याने त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कंस पवार यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय. त्यामुळे आता आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पवार कुटुंबीयांनी केलीये.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live