विवस्त्र करुन आदिवासी महिलेला मारहाण; महाराष्ट्राला लाज आणणारी बातमी..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? असा विचार करायला लावणारी घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. केवळ शेतात शेळी शिरली या कारणावरुन, चक्क एका आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातीलच काही उच्चभ्रूंनी 12 सप्टेंबर रोजी ही मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे.

भाणगाव येथे राहणाऱ्या आदिवासी दाम्पत्याची शेळी गावातील वागस्कर यांच्या शेतात शिरल्याच्या कारणावरुन, काही लोकांनी पीडितेच्या नवऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मध्ये पडलेल्या पीडितेला उपस्थितांनी जातीवाचक शिवीगाळ करत, विवस्त्र करुन मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करण्यास गेले असता, तक्रार खोटी असल्याचं सांगत नोंद करुन घेण्यास तीन दिवस टाळाटाळ केली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर घटनेच्या तब्बल तीन दिवसांनंतर जयसिंग वागस्कर, संतोष वागस्कर, मनोहर वागस्कर, जेसीबी चालक लुटे अशा चौघांविरोधात ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र घटनेला 15 दिवस उलटून गेल्यानंतरही एकाही आरोपीला अद्याप अटक न झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करण्यात येऊ लागली असून आरोपींकडून कुटुंबाला संपवण्याच्या धमक्याही मिळतायत. दरम्यान, न्याय न मिळाल्यास विष पिऊन आत्महत्येचा इशाराही पीडितेने दिला आहे.

WebTitle : marathi news ahemadnagar crime case of atrocity maharashtra  

संबंधित बातम्या

Saam TV Live