पोलिस अधिकाऱ्याची 'वर्दी' चोरीला.. पोलिस अधिकाऱ्यालाच 6 लाखांचा गंडा

सचिन अग्रवाल, साम टीव्ही अहमदनगर
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

कुणाची वस्तू हरवली किंवा चोरल्यावर माणूस पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतो. पण पोलिसाचीच वस्तू हरवल्यावर त्यांनी कुणाकडं दाद फिर्याद करायची असा प्रश्न निर्माण झालाय. त्यात पोलिस अधिकाऱ्याची वर्दी म्हणजे गणवेशच चोरीला गेला असला तर?

अशक्य वाटतं.. पण हे खरं आहे. नगर जिल्ह्यातल्या शेवगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांचा गणवेशच चोरीला गेलाय. पोलिस अधिकाऱ्याची आन-बान-शान असलेल्या वर्दीच चोरीला गेल्यानं पोलिस खात्याची अब्रू वेशीला टांगल्यासारखी स्थिती झालीय. राज्यातली बहुदा ही पहिलीच घटना असावी.

गोविंद ओमासेंची वर्दी चोरण्यावरच चोर थांबले नाहीत. त्यांना एका आमदाराचा आवाज काढून सहा लाखांना गंडा घालण्यात आलाय. वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेल्या गोविंद ओमासेंचा गणवेशच चोरीला गेलाय. ज्यांना स्वतःच्या गणवेशाचं रक्षण करता आलं नाही ते सर्वसामान्यांचं कसं रक्षण करणार असा सवाल उपस्थित केला जातोय.

WebTitle : marathi news ahemadnagar police uniform stolen by thief 

संबंधित बातम्या

Saam TV Live